
वाळूजमहानगर (ता.20) – वाळूज येथे स्वयंघोषित लोड शेडिंग सुरू असून परीक्षा सुरू असल्याने त्याचा विद्यार्थ्यांच्या जीवनाशी परिणाम होतो. त्यामुळे हे लोड शेडिंग तात्काळ बंद करण्यात यावे. या मागणीचे निवेदन महावितरणला शिवसेनेच्या वतीने देण्यात आले आहे.
या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की,
वाळुज येथे मागिल ५ ते ६ महिन्यापासुन सुरू असलेली लोडशेडींग व त्याव्यतिरिक्त दिवसभरात किमान ५० वेळेस विजेचा लंपडाव हा सातत्याने सुरू आहे. या परिस्थितीत गावकऱ्यांचे प्रचंड हाल होत असुन १० वी १२ वी व तसेच सर्वच विद्यार्थ्याचा परिक्षाचा काळ असल्याने विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. पुढे एप्रिल महिन्यात श्रीराम नवमी, हनुमान जयंती, महाविर जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती रमजान ईद, असे सर्व धर्माचे धार्मीक सण उत्सव येत असुन त्या सणावर देखील विजेचे सावट आहे. म्हणुन वाळुज येथील नागरीकामध्ये मोठ्या प्रमाणात महावितरण कार्यालयाबद्दल राग व असंतोष निर्माण होत असुन असंतोषाचा उद्रेक होण्यापुर्वीच आपण लोडशेडींग बंद करावी. अन्यथा शिवेसना व वाळुज परिसरातील जनतेच्या वतीने महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढुन जन आंदोलन करण्यात येईल. असा शिवसेना उपतालुका अध्यक्ष नंदकुमार राऊत, शहर प्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य सचिन काकडे, राहुल भालेराव, दयानंद साबळे, संतोष आरगडे, प्रविण साकला, शुभम हुले, सय्यद शाकेर, अनिल जमधडे, गौरव राऊत यांनी दिला आहे.
