February 5, 2026

वाळूजमहानगर, (ता.30) – औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघासाठी सोमवारी (ता.30)रोजी घेण्यात आलेल्या मतदान प्रक्रियेत वाळुज येथील मतदान केंद्रावर एकूण 294 मतदारांपैकी 235 म्हणजेच ऐंशी टक्के मतदारांनी हक्क बजावला. त्यात 79 महिला शिक्षिका तर 156 पुरुष शिक्षकांचा समावेश आहे. अत्यंत शांततेत झालेल्या या मतदानाची आकडेवारी 79.93 टक्के आहे.

औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाच्या मतदान प्रक्रियेला वाळूज बूथवर सोमवारी (ता.30) रोजी अत्यंत शांततेत मतदान झाले. सकाळी आठ वाजता सुरू झालेले हे मतदान सायंकाळी चार वाजेपर्यंत चालले. या निवडणुकीसाठी 14 उमेदवार निवडणूक रिंगणात असून विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडले ते गुरुवारी (ता.2)
रोजी समजणार आहे.

सध्या राजकारण चांगलेच जोरावर असल्याने प्रत्येक निवडणुकीवर राजकीय पक्षाचा डोळा आहे. शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीकडेही सर्वच राजकीय पक्षांनी जोर लावला. जो तो आपलाच उमेदवार निवडून येईल, असाही दावा या निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजकीय पक्षाकडून केला जात आहे. या निवडणुकीसाठी
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या महाविकास आघाडी आणि भाजप या पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे.

या निवडणुकीसाठी वाळूज येथील जिल्हा परिषद शाळेत मतदान केंद्र क्रमांक 30 वर एकुण 294 शिक्षक मतदार आहेत. त्यात 113 महिला तर 181 पुरुष शिक्षकांचा समावेश आहे. या मतदान केंद्रावर शिक्षक मतदार यादी भाग क्र. 47 अंतर्गत वाळूज, पिंपळखेडा, रांजणगाव (शेणपुंजी), नांदेडा, आसेगाव, सिंधी सिरजगाव. तर शिक्षक मतदार यादी भाग क्र. 52 अंतर्गत तुर्काबाद, जिकठाण, धानोरा बु. अंबेलोहळ, येसगाव व कासोडा ही गावे समाविष्ट आहेत.

सकाळी 8 ते सायंकाळी 4 पर्यंत 79 महिला शिक्षिका तर 156 पुरुष अशा 235 शिक्षकांनी मतदान केले. अत्यंत शांततेत झालेल्या या मतदानाची आकडेवारी 79.93 टक्के झाली. येथे मतदान केंद्र अध्यक्ष म्हणून व्ही पी पुरी काम पाहत आहे. तर ग्रामसेवक संभाजीराजे बनकर, कारभारी नेटके, अशोक पाटेकर आदी त्यांना सहकार्य करत आहे.
           निवडणूक रिंगणातील उमेदवार
विक्रम काळे, किरण पाटील, कालिदास माने, अनिकेत वाकचौरे पाटील, प्रा.अश्विनकुमार क्षीरसागर, आशिष देशमुख, कादरी शाहिद अब्दुल गफूर, नितीन कुलकर्णी, प्रदीपदादा साळुंके, मनोज पाटील, विशाल नांदरकर, सूर्यकांत विश्वासराव, संजय तायडे आणि ज्ञानोबा डुकरे हे या निवडणुकीत उमेदवार आहेत.
         राजकीय पक्षाची प्रतिष्ठा
एक राजकीय पक्ष आपल्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आपली राजकीय प्रतिष्ठा पणाला लावून प्रचार केला आहे. दरम्यान या निवडणुकीसाठी सोमवारी (ता.30) रोजी मतदान होत असून औरंगाबाद शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *