March 23, 2026


वाळुज महानगर, (ता.8) – वाळूज परिसरातील बजाजनगर, रांजणगाव, तुर्काबाद (खराडी), जोगेश्वरी, लिंबेजळगाव, जिकठाण, पंढरपूर येथे डीजे मुक्त श्री गणेश विसर्जन मिरवणूक शनिवारी 6 सप्टेंबर रोजी सायंकाळी मोठ्या उत्साहात व शांततेत काढण्यात आली. मिरवणूकीचा मध्यरात्री समारोप झाला. या मिरवणुकीत सहभागी अनेक मंडळांनी मनमोहक देखावे सादर केले होते. हे देखावे व मिरवणुकीचा आनंद घेण्यासाठी बजाजनगर वासियांनी मोठी गर्दी केली होती. 

डीजे मुक्त गणेश उत्सव व विसर्जन –

छत्रपती संभाजीनगर शहरासह व वाळूज महानगर गणेश संघ या सह एकूण 8 महासंघाने या वर्षीच्या गणेश उत्सवात डि जे च्या वापरावर पोलिसांच्या सहकार्याने बंदी घातली होती. त्यामुळे डीजेच्या कर्णकर्कश आवाजापासून नागरिकांना दिलासा मिळाला. डीजे मुक्त गणेश उत्सव व विसर्जन मिरवणूक मुळे सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी टाळ मृदंग, ढोल ताशे पथक, तुतारी, शहनाई, लेझीम पथक आदी पारंपरिक पद्धतिने वाद्यांच्या गजरात मिरवणुक काढली.

 

मानाचा गणपती व पालखी –

बजाजनगर येथे सायंकाळी विसर्जन मिरवणूक सुरू झाली. त्रिमूर्ती चौक येथील सिद्धिविनायक गणेश मंडळाच्या ‘मानाचा गणपति’ व पालखीचे विधीवत पूजन झाल्यानंतर मिरवणूकीचा शुभारंभ करण्यात आला. त्रिमूर्ति चौक येथे एम आय डी सी वाळूज पोलिस ठाण्याच्या वतीने भव्य स्टेज उभारण्यात आले होते. या स्टेजवर मिरवणुकीत सहभागी झालेल्या गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा व गणेश भक्तांचा पोलिस प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला. येथे सहायक पोलिस निरीक्षक मनोज शिंदे, पोलिस कर्मचारी बाळासाहेब आंधळे, राजाभाऊ कोल्हे, पोलीस कॉन्स्टेबल अरुण उगले, महिला पोलिस कर्मचारी आदींसह बी जी गायकवाड, प्रकाश निकमची स्टेजवर उपस्थिती होती.

राजकीय पक्ष व संघटनांतर्फे सत्कार –

मिरवणूक मार्गावर स्टेज उभारून विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटने तर्फे स्टेज उभारून गणेश मंडळ पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.

शिवसेना शिंदे गट –
या स्टेज वर सरपंच सुनील काळे, बाप्पा दळवी यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री संजय शिरसाट यांनी मिरवणुकीत सहभाग घेतला. त्यांचा ठिकठिकाणी सत्कार करण्यात आला.

वाळूज महानगर गणेश महासंघ –
लोकमान्य चौक येथे वाळूज महानगर गणेश महासंघातर्फे भव्य स्टेज उभारण्यात आले होते. येथे संस्थापक अध्यक्ष रामचंद्र कसूरे, अध्यक्ष बालासाहेब गाढे, सिद्राम पारे, हेमेंद्र देवरे, रमेश पाटिल यांच्यासहमहासंघाचे अनेक पदाधिकारि उपस्थित होते.

       शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे –

त्रिमूर्ती चौकात शिवसेना उबाठा तर्फे उभारलेल्या स्टेजवर अरविंद धीवर, बाळासाहेब कारले, विशाल खंडागळे व अन्य पदाधिकारि उपस्थित होते.

स्व.जगन्नाथराव भोंडवे सामाजिक प्रतिष्ठान –
शिवसेनेचे तालुका प्रमुख हनुमान भोंडवे, अशोक लगड़, विजय उखळे यांच्यासह या स्टेजवर अनेकांची उपस्थिती होती.

भाजपा वाळूजमहानगर –
मोहटादेवी चौकात भाजपच्या स्टेजवर जिल्हाध्यक्ष संजय खंबायते, प्रा.संजय सांभाळकर, गजानन नांदुरकर, विजय सोमवंशी, विष्णू खेडकर, राजेंद्र अवताडे आणि अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

एमआयडीसीची चोख व्यवस्था –

एमआयडीसी प्रशासनाच्या वतीने यंदा बजाजनगरातील विसर्जन स्थळी यंदा चोख व्यवस्था करण्यात आली होती. येथील विहिरीच्या स्वच्छ पाण्यात अंदाजे 3 हजार पेक्षा ही जास्त वाळूज औद्योगिक क्षेत्र व बजाजनगरातील घरगुती व सार्वजनिक गणेश मंडळाच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. येथे डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या 125 स्वयंसेवकांनी निर्माल्य संकलन केले. तसेच गणपतीच्या आरतीसाठी टेबलची व्यवस्था करण्यात आली होती. एम आय डी सी चे उपअभियंता गणेश मुळीकर व सहायक प्रशांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली येथे यावर्षी चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती.
गरवारे कंपनी आणि वाळूज एमआयडीसी अग्निशमन केंद्राचे दोन अग्निशामक बंब सज्ज ठेवण्यात आले होते. पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर, पोलिस उपायुक्त शर्मिष्ठा घारगे वालवलकर, सहायक पोलिस आयुक्त संजय सानप, एम आय डी सी वाळूज पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे, वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक सचिन इंगोले, उप निरीक्षक विठ्ठल घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचाऱ्यांसह एस आर पी, पोलिस आयुक्तालयाचा स्ट्राइकिंग फोर्स, होमगार्ड आदिचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

दरम्यान वाळूज परिसरातील रांजणगाव, तुर्काबाद (खराडी), जोगेश्वरी, लिंबेजळगाव, जिकठाण, पंढरपूर, वळदगाव येथे येथेही भव्य मिरवणूक काढून गणरायाला निरोप देण्यात आला.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *