वाळूज महानगर, (ता.27) – वाळूज औद्योगिक वसाहतीतील सुप्रीम सिलिकॉन्स या केमिकल कंपनीला अचानक आग लागली. सोमवारी 27 ऑगस्ट रोजी दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास लागलेल्या या आगीत कच्चा माल व मशिनरीसह कोट्यावधी रुपयाचे नुकसान झाले. मात्र सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, छत्रपती संभाजी नगर येथील अभिजित सुर्यंवशी व अभिजित गोस्वामी यांची वाळूज औद्योगिक वसाहतीत सेक्टर एच -55 येथे सुप्रीम सिलिकॉन्स नावाची कंपनी आहे. या कंपनीत केमिकलचे उत्पादन करून विविध ठिकाणी पुरवठा केल्या जाते. या कंपनीतमध्ये जवळजवळ 20 कामगार एकाच शिफ्ट मध्ये काम करतात. सोमवारी 27 ऑक्टोबर रोजी दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास केमिकलसाठी लागणारे पाणी गरम करत असतांना अचानक एलपीजी गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. त्यामुळे बाजूलाच असलेल्या केमिकलच्या ड्रमला आग लागल्याने भडका उडल्याने ही आग भडकली. त्यामुळे या आगीन काही क्षणातच रौद्ररुप धारण केले. ही माहिती मिळाताच वाळूज आग्नीशमन दलाचे जवान दोन बंबासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र आग आटोक्यात येत नसल्याने बजाज व गरवारे कंपनीचे दोन बंब
व खाजगी पाण्याचे 12 ते 15 टँकर बोलवावे लागले. त्यानंतर तब्बल दोन ते तीन तासाच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आली. दरम्यान कंपनीसमोर बघ्याची मोठी गर्दी झाल्याने वाळुज एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
सुदैवाने जीवितहानी नाही –
या आगीत कंपनीतील तयार झालेला माल, कच्चामाल, मिक्सर, मशिनरी, केमिकल ड्रम आणि इतर साहित्य जळून मारे कोट्यावधी रुपयाचे नुकसान झाले. ज्यावेळी कंपनीला ही भीषण आग लागली. त्यावेळी कंपनीत सुमारे 20 कामगार काम करत होते. मात्र सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.
