March 23, 2026


वाळूज महानगर, (ता.27) – पायी जाणारी पंढरपूर वारी, वारीतील गोल रिंगण, भगव्या पताका घेऊन विठू माऊलीचा गजर करणारे वारकरी आणि गोल रिंगणातून धावणारा घोडा. अशा या पंढरीच्या महिन्याचे वर्णन करणारा देखावा बजाजनगर येथील गणेश भक्तांना आकर्षण करत आहे.

शिवराय हाऊसिंग ग्रुप बजाजनगर, छत्रपती संभाजी नगर येथील माणिक रामचंद्र पाटील यांच्या घरी सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री गणरायाची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येक वर्षी पाटील हे घरात वेगवेगळे देखावे गणपती समोर तयार करतात. यावर्षी पाटील यांनी गणेश भक्तांसाठी पंढरपूरच्या विठ्ठल रुक्माईचा महिमा व आषाढी कार्तिकी एकादशी दिंडी सोहळ्यातील वारकरी व पालखीचा देखावा तयार केला आहे. त्यामध्ये माऊलींच्या पादुका रथात ठेवल्या आहेत व रथासमोर वारकरी मंडळी दिंडी काढून वारीला प्रस्थान करत आहेत. तसेच या दिंडी सोहळ्यातील माऊलींचा घोडा व रिंगणही दाखवले आहेत. हा देखावा पाहिल्यानंतर प्रत्येकाला पंढरपूरला जाणाऱ्या दिंडीची आठवण होते. आणि भाविक आपोआपच जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. असे पुटपुटतात. हा देखावा पाहण्यासाठी गणेश भक्तांची पाटील यांच्या घरी गर्दी होत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *