
लिंबेजळगाव, (ता.23):- साखर पुड्याकरता बारामतीहुन संभाजीनगरात येणाऱ्या गॅलेक्सी या खाजगी टँव्हल्स बसचे टायर फुटल्याने बस विरुद्ध दिशेला जाऊन धडकली.
संभाजीनगर ते नगर महामार्गावरील लिंबेजळगाव (ता.गंगापूर) येथील हाँटेल व्रदावन समोर शुक्रवारी (ता.24) दुपारी 2 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.
मात्र सुदैवाने या अपघातात कुणीही जखमी झाले नाही.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, चौधर परीवार बारामतीहुन गॅलक्सी या खाजगी टँव्हल्स (एम एच 2525) बसने संभाजीनगरात येत असतांना शुक्रवारी (ता.24) दुपारी 2 वाजेच्या सुमारास लिंबे जळगाव येथील हॉटेल वृंदावन जवळ अचानक बसचे टायर फुटल्याने बस विरुद्ध दिशेला जाऊन कंपाउड वालला धडकली. या बस मध्ये 43 वऱ्हाडी होते. मात्र सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. विशेष म्हणजे विरुद्ध दिशेला एकही वाहन जात नसल्याने मोठा अनर्थ टळला. बस पहाटेच बारामतीहुन निघाल्याने पागीमागे 20 किलोमीटर अंतरावर अल्पोपहार केला. काही प्रवासी झोपेत असल्याचे संदीप चौधर या वर्हाडींनी सागीतले.
अपघात होताच येथील सुदर्शन गवळी पाटीलसह वृंदावन हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी धावाधाव करीत बसमधील सर्व प्रवाशांना बसच्या बाहेर काढले. घाबरलेल्या वर्हाड्यांनी दिलासा देत शांत केले. घटनेचे स्वरुप वधुपक्षाला सागीतले असता त्यांनी व्यवस्था केलेल्या वाहनाद्वारे वर्हाडी शहरात आले.
