March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.1) – वडगाव (को.) येथे श्री राम जन्मभूमी मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा निमित्त विश्व हिंदू परिषद वाळूज प्रखंड विभागाच्या वतीने देवगिरी प्रांत अध्यक्ष संजय बारगजे यांच्या मार्गदर्शनाखाली वाळूज प्रखंड संयोजक सुमित चोरडिया यांनी आयोजित केलेल्या शिबिरात मंगळवारी (ता.30) रोजी जवळजवळ दीडशे जणांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.

या शिबिराचे उद्घाटन भाजपा जिल्हा सरचिटणीस तथा माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल चोरडिया यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरामध्ये 150 पेक्षा अधिक रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच गरजू रुग्णांना मोफत औषधी वितरित करण्यात आली. शिबिरामध्ये डॉ. हेडगेवार रुग्णालयाचे डॉ. प्रफुल्ल पाटील व डॉ. हेमंत कुलकर्णी या तज्ञ डॉक्टरांनी तपासणी केली.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाळूज प्रखंड संयोजक सुमित चोरडिया यांनी केले. यावेळी अनिल पाटील, अर्जुन उबाळे, माजी ग्रामपंचायत सदस्य अमित चोरडिया यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महेश फलके, गजानन भागवत, हरपाल राजपूत, शिवा चौधरी,जिग्गर गावडे,राम झांबरे, श्याम दांडगे, श्रीराम यादव यांनी परिश्रम घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *