March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.22) – राहत्या घरी छताच्या फॅनला साडीच्या साह्याने गळफास घेऊन 55 वर्षीय इसमाने आत्महत्या केली. वाळूज परिसरातील वडगाव (को.) येथे घडलेली ही घटना रविवारी (ता.21) रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, निरंकारनगर, वडगाव (को.) येथील नवनाथ बालकराम आहेरकर (55) याने रविवारी (ता.21) रोजी दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास राहत्या घरी छताच्या सिलिंग फॅनला साडीच्या साह्याने गळफास घेतल्याने तो बेशुद्ध झाला. त्यास उपचारार्थ अमोल भगवान निकम व रामनाथ बालकनाथ आहेरकर यांनी घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले.
याप्रकरणी घाटी मेडिकल चौकी येथून पोलीस हवालदार ए आर खिल्लारी यांनी दिलेल्या माहितीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *