
वाळुज महानगर, – वडगाव (कोल्हाटी) येथील आनंद बुद्ध विहार येथे 69 व्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त करण्यात आलेला वर्षावास सांगता सोहळा 13 ऑक्टोबर रोजी उत्साहात झाला. यावेळी विविध कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते.
प्रथम पु. भिक्खु ज्ञानरक्षित थेरो पु. भिक्खु एम. राहुल थेरो, भंत्ते महामोगल्यान यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे अभिवादन करून त्रिशरण पंचशील घेण्यात आले. यावेळी बीमटाचे अध्यक्ष सुभाष मुदगडकर, रवीकुमार वसाटे, प्रशांत देवतळे, नरेंद्र त्रिभुवन, रावसाहेब धोंडरे, एल एल गायकवाड, विकास रामटेके, यशवंत जोगदंडे आदींची उपस्थिती होती. त्यानंतर पू. भिक्खु संघाची स्वागत रॅली काढून भगवान गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार करून पूजन करण्यात आले. पू. भिक्खू संघाने पंचशीलाचे महत्व, आर्य अष्टांगिक मार्ग, महामानवांचे विचार आत्मसात करण्याची उपस्थिताना धम्मदेसना दिली. यावेळी भिक्खू संघाला चिवरदान करण्यात आले. कार्यक्रमप्रसंगी वर्षावास उत्सव समिती 2025 चे ग्रंथवाचक गौतम पाईकराव, वंदना सावतकर, कौशल्यबाई निकम, कलाबाई साळवे, विजय गायकवाड, सतीश साळवे, जगन्नाथ निकम, आरती साळवे, द्वारकाबाई नरवडे, नामदेव केदारे, भगवान नरवडे, मगन निकम, अनुसया जोगदंडे, रेखा साळवे, अनिल जाधव, शारदा पाईकराव आदी उपस्थित होते. आनंद बुद्ध विहाराचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अशोक निकम, रमेश दाभाडे, अँड नामदेव सावते, शेषराव जोगदंडे, गौतम मोरे, सिद्धार्थ पैठणे, विजय प्रधान, विष्णू भावले, ईश्वर लोखंडे, ज्ञानेश्वर जाधव, व्हि के जाधव यांच्यासह उत्तम भडगळ, बाळू होर्शिळ, मुकुंद जोगदंडे, रवी लोंढे, शंकर खरात, कचरू दळवी, कृष्णा गायकवाड, संतोष खंडागळे, सागर त्रिभुवन, लक्ष्मण परकारे, लक्ष्मण धुळे, सागर नरवडे, माणिक जोगदंडे, किरण चौतमल, सुनील साळवे, एस पी हिवराळे यांच्यासह आनंद बुद्ध विहाराचे पदाधिकारी व बौद्ध उपासक उपासिकांनी परिश्रम घेतले.
