March 23, 2026

वाळूजमहानगर, (ता.9) – वडगाव (को.) बजाजनगर येथील जिल्हापरिषद शाळेत ह्युमाना पीपल टु पीपल इंडिया संस्थेच्या वतीने गुरुवारी (ता.8) रोजी आयोजित आरोग्य शिबिरात 210 गरोदर माता व बालकांची मोफत तपासणी करण्यात आली.

सुरक्षित मातृत्व आणि बाल स्वास्थ्य परियोजने अंतर्गत गरोदर माता व बालकांची मोफत आरोग्य तपासणी आणि औषधी वाटप शिबीर आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच सुनील काळे, तंटामुक्ती अध्यक्ष कृष्णा साळे व मुख्याध्यापक सुनिल चिपाटे यांच्या हस्ते करण्यात आले.

या शिबिरामध्ये बालरोगतज्ज्ञ डॉ तुषार चव्हाण, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ शुभांगी डापके व संस्थेचे डॉ. भार्गव देशपांडे यांनी रुग्णांना सेवा पुरविल्या. ह्युमाना पीपल टु पीपल इंडिया संस्थेचे डॉ. भार्गव देशपांडे व शंकर गुर्जर यांनी नियोजन केलेल्या या आरोग्य शिबिरासाठी वडगाव (को.) येथील जिल्हा परिषद शाळेच्या वाघ सर यांची मदत लाभली. परिसरातील 210 माता व बालकांनी शिबिराचा लाभ घेतला.

           https://youtu.be/W3D0Og4MKQ0?si=-DI6auQrL2LajLuQ

       आर के न्यूज लाईव्हला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. संपर्क -99 23 27 63 66

या शिबिराच्या यशस्वीतेसाठी ह्युमाना पीपल टु पीपल इंडिया संस्थेच्या कार्यकर्त्या प्रीती साळवे, रिमा गरुड, मेघा ताकभते तसेच अंगणवाडी कार्यकर्त्या निर्मला काळे व आशा कार्यकर्त्या प्रतिभा महामुनी व सुनंदा काळे यांनी योगदान दिले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *