
वाळूजमहानगर, (ता.17) – वाळूज परिसरातील वडगाव कोल्हाटी येथील जिल्हा परिषद शाळेत पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ व मिठाई देऊन गुरुवारी (ता.15) रोजी प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. 
या वर्षाच्या शैक्षणिक क्षेत्राला गुरुवारी (ता.15) रोजी सुरुवात झाली. शाळेच्या पहिल्या दिवशी वडगाव कोल्हाटी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प, चॉकलेट, पुस्तके आणि मिष्टान्न भोजन देऊन तसेच ट्रॅक्टर मधून रॅली काढण्यात आली. पालकांना देखील या आनंदात सामील करून घेतले. याप्रसंगी मुख्याध्यापक सुनील चिपाटे, हरिश्चंद्र रामटेके, सचिन वाघ, सोनाली निकम, रिटा मार्कंडेय, अनिता राठोड, मंगल गाडेकर, विद्या सोनोने आदींची उपस्थिती होती.
