February 5, 2026

वाळूज महानगर – वडगाव कोल्हाटी येथील 36 वर्षीय कामगार घरात कोणास काही एक न सांगता निघून गेल्याने तो बेपत्ता झाल्याचे नोंद पोलिसात करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अमोल सुभाष देशमुख हा वडगाव कोल्हाटी येथील गट नंबर मध्ये राहतो. तो वाळूज औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत काम करतो. मंगळवारी 16 डिसेंबर रोजी रात्री 7:15 वाजेच्या सुमारास अमोल हा कंपनीतून सुट्टी झाल्यानंतर घरी जाण्यासाठी निघाला. मात्र तो घरी पोहोचलाच नाही. म्हणून त्याची कंपनीसह इतरत्र चौकशी केली असता तो मिळून आले नाही. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. महिला पोलीस हवालदार रेखा चांदे या त्याचा शोध घेत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *