वाळूजमहानगर, (ता.23) – बाहेर जाऊन येतो असे म्हणून तीन दिवसापासुन बेपत्ता असलेल्या एका 32 वर्षीय तरुणाचा मृतदेह वडगाव कोल्हाटी येथील पाझर तलावात तरंगताना शनिवारी (ता.22) दुपारी चार वाजेच्या सुमारास आढळून आला. मात्र हा खून आहे की, आत्महत्या या संभ्रमात पोलीस सापडले आहेत
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वडगाव कोल्हाटी पाझर तलावाजवळ शनिवारी (ता. 22) रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास तंंटामुक्ती अध्यक्ष कृष्णा साळे यांना पाण्यात तरंगतांना एक मृतदेह दिसला. ही माहिती साळे यांनी एमआयडीसी वाळूज पोलीसांनी दिली. माहिती मिळताच पोउपनि. विनोद अबुज, पोअं बाळसाहेब आंधळे, राजाभाऊ कोल्हे, सुरेश तारव आदीनी घटनास्थळी धाव घेत ग्रामपंचायत कर्मचारी बाळू शेरे, शंकर शेळके, राजू वाघमारे, संतोष भालेराव यांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढला. तलावातील पाण्यात असलेल्या खेकडे, माशांनी मृताचा चेहरा विद्रुप झाला होता. दरम्यान त्यास बेशुध्द अवस्थेत घाटीत दाखल करण्यात आले असता डॉक्टरानी मयत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात रात्री उशीरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
मोबाईलवरून पटली ओळख –
तलावात आढळलेल्या मताच्या खिशात मोबाईल होता. त्यावरून त्याची ओळख पटली. अंकुश यादव काटकर (वय 32) रा.वडगाव कोल्हाटी असे त्याचे नाव आहे. तीन दिवसांपूर्वी तो बाहेर जाऊन येतो. असे म्हणून घरातून बेपत्ता होता. त्याच्या पत्नीने दिलेल्या खबरीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात बेपत्ताची नोंद करण्यात आली आहे. मात्र यादव याने आत्महत्या केली की, त्याचा कोणी खून केला. हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.