February 5, 2026

लिंबे जळगाव ते पंढरपूर निघालेली पायीवारी
वाळूज महानगर – विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, असा भजनाचा गजर करीत बुधवारी ७ सप्टेंबर
भाद्रपद शुद्ध भागवत एकादशी निमित्त लिंबे जळगाव ते श्री क्षेत्र पंढरपूर (वळदगाव) पायीवारी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात मार्गस्थ होऊन दुपारी १२वा. श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थान श्री क्षेत्र पंढरपूर (वळदगाव) येथे महाआरती करण्यात आली.

पंढरपूर येथील विठ्ठल रुक्माई मंदिरात कीर्तनाचा आनंद घेताना भाविक

हभप उद्धव महाराज आनंदें, हभप रामायणाचार्य‌ संजय महाराज कुर्हाडे गुरुजी यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली दर महिन्याच्या शुद्ध व वद्य एकादशीला निघत असलेल्या या पायीवारीत असंख्य वारकरी भाविकांनी सहभाग घेतला. या सोहळ्यात प्रकाश हाडुळे, काकासाहेब हिवाळे, भाऊसाहेब तारक, विणेकरी हभप गणपतराव कानडे, रंगनाथ हिवाळे, नंदकुमार लांडगे, आदीसह‌ रामनगर अफजलपुर, लिंबेजळगाव, शिवराई, वाळूज सह महीला वर्ग व भाविकांची उपस्थिती होती.
हभप श्रीनाथ महाराज गोसावी ,(श्री क्षेत्र पैठण)
यांचे सुश्राव्य हरीकीर्तनानंतर नंदकुमार जगताप, व वाळूज येथील सुनिल राऊत यांनी दिंडीतील भाविकांना फलहार व चहा दिला.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *