February 5, 2026

वाळूज महानगर, (ता.8) – गोमांस तस्कर व गोरक्षकांमध्ये राडा होऊन सुद्धा वाळूज परिसरातून गोवंश मांसाची वाहतूक सुरुच असून वाळुज पोलिसांनी पुन्हा एक ऑटोरिक्षा दोन क्विंटल गोमांस जप्त केले. ही कारवाई सोमवारी 8 डिसेंबर रोजी सकाळी वाळूज येथील लांजी रोडवर करण्यात आली.

याविषयी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, एक रिक्षा (एम एच 20, ई एफ-7447) मध्ये गोमांस असून त्याची बेकायदेशीर वाहतूक होत आहे. अशी माहिती वाळुज ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक वंदना मुळे यांना सोमवारी 8 डिसेंबर रोजी सकाळी मिळाली. त्यामुळे पोलिसांनी रिक्षा चालक साहेबखा युनूसखा पठाण (32) रा. सांगळे गल्ली, हर्सूल व असलमखान अलीमखान पठाण रा. चिनार गार्डन, पडेगाव यांना रिक्षासह थांबवून तपासणी केली असता, रिक्षा मधील 4 पोत्यामध्ये जनावरांचे कापलेले मांस मिळून आले. हे गो मांस मुज्जू शकील कुरैशी रा. शेंदूरवादा याने हे गायी कापून छत्रपती संभाजीनगर शहरात विक्री करण्याच्या उद्देशाने पाठवले आहे. पोलिसांनी 40 हजार रुपये किमतीचे मांस व 1 लाख रुपये किमतीची रिक्षा असा 1 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलीस अंमलदार सचिन राजपूत यांनी दिलेल्या फर्यादी वरून आरोपी रिक्षा चालक साहेबखा युनूसखा पठाण रा. सांगळे गल्ली, हर्सूल, असलमखान अलीमखान पठाण रा. चिनार गार्डन, पडेगाव व मुज्जू शकील कुरैशी रा. शेंदूरवादा यांच्या विरुद्ध विविध कलामांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रमेश राठोड हे करीत आहेत.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *