
वाळूज महानगर, (ता.28) – राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाळूज येथील कार्यकारिणीची निवड पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीशभाऊ चव्हाण यांच्या हस्ते मंगळवारी (ता. 26) रोजी करण्यात येऊन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले.

शिवाजीनगर परिसरातील अविनाश कॉलनी येथे झालेल्या छोटे खाणी एका कार्यक्रमात आमदार सतीश भाऊ चव्हाण यांनी या नियुक्त्या केल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाळूज शहराध्यक्षपदी रोहित तुकाराम जाधव, उपाध्यक्षपदी रामराई येथील संजय भागिनाथ कांजळे तर कार्याध्यक्षपदी नदी झुंबरवाला यांची नियुक्ती करण्यात आली. त्यावेळी वाळूचे माजी ग्रामपंचायत सदस्य तथा पोखरा येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन लक्ष्मण पाठे, घाणेगाव येथील चेअरमन अंकुश काळवणे, आंबेलोहोळ येथील रमेश निश्चित, दळे पाटील, औताडे पाटील, रोहन भालेराव, श्रीराम बोचरे आदिंसह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 
यावेळी आमदार सतीशभाऊ चव्हाण यांच्या हस्ते अविनाश कॉलनी येथील हेरंब गणेश मंडळ, कलानगर येथील श्री गजानन महाराज मंदीरातील हिंदू धर्म रक्षक गणेश मंडळ,
वाळूज येथील नवनिर्माण गणेश मंडळ व वाळूज गणेश महासंघ येथे गणरायाची आरती करण्यात आली. यावेळी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष काकासाहेब चापेपाटील, ग्रामपंचायत सदस्य सचिन काकडे, ग्रामपंचायत सदस्या विमलबाई चापे, अमजदखा पठाण, दयानंद साबळे, माजी ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार राऊत, नंदू सोनवणे, नासेर पटेल, बबन गायकवाड, डॉक्टर सि टी पवार आदींची उपस्थिती होती.
