March 23, 2026


वाळूज महानगर, (ता.3)- बजाजनगर येथील राजा शिवाजी विद्यालयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने विद्यालयातील शिक्षकांना व विद्यार्थ्यांना आपत्ती आल्यास काय करावे. या विषयी एक दिवसीय प्रशिक्षण घेण्यात आले.
यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कार्यालय मार्फत मास्टर ट्रेनर रवींद्र किरण काळेकर यांनी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना व शिक्षकांना वीज पडणे, पूर परिस्थिती, आग लागणे, गॅस, कावीळ, भूकंप परिस्थिती, रस्ते अपघात, दुष्काळ, सर्पदंश, जुलाब सादृश्य आजार अशी आपत्ती आल्यास प्रथम यावर अत्यंत महत्त्वपूर्ण उपयोगी असे मार्गदर्शन व प्रात्यक्षिक केले. यावेळी त्यांना त्यांचे सहकारी बाळासाहेब खेडगावकर व मच्छिंद्र पंडित यांनी सहकार्य केले. याप्रसंगी राजा शिवाजी विद्यालयातील मुख्याध्यापिका व्ही.के. जाधव, राजन सोमासे, उमेश डावखर, प्रवीण राजे, विजयकुमार कोऱ्हाळे, अनिल पाटील, बी.जी. गायकवाड उपस्थित होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *