
वाळूजमहानगर, ता.25 – रांजणगाव (शेणपुंजी) येथे भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने सकल रांजणगाव वाशियासाठी आयोजित करण्यात आलेल्या हळदी कुंकू कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग नोंदवला. यावेळी झालेल्या प्रश्नमंजुषा कार्यक्रमात शंभर महिलांनी पैठणी साड्या जिंकल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार अनुराधा चव्हाण तर उद्घाटक म्हणून भाजपा महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष वर्षा भोसले होत्या. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून भाजपा महिला आघाडीच्या त्रिशला हांचाटे, जयमाला वाघ, सरपंच योगिता महालकर, जि.प. सदस्य उषा हिवाळे, महिला बालविकास प्रकल्प अधिकारी कल्पना देशमुख, प्रदेश महामंत्री मीना मिसाळ, जिल्हा सरचिटणीस ज्योती गायकवाड, युवा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष वैशाली खेडकर, जिल्हा सरचिटणीस मनीषा व्यवहारे, तालुकाध्यक्ष शीला गाढे, नंदा राजपूत, अर्चना पवार, शहीद भगतसिंग शाळेच्या मुख्याध्यापिका भारती साळुंखे, तारा शिंदे, उषा कदम, प्रतिभा पाटील, मोनिका सवाई, सुरेखा जाधव, कांता जाधव, सविता पवार, संगिता चव्हाण, किरण जाधव, ग्रामपंचायत सदस्य मीना पनाड, ज्योती डाके, सामाजिक न्याय विभागाच्या मिनाक्षी जाधव आदींची उपस्थिती होती.
- यावेळी विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना पहिले बक्षिसे एलडी टीव्ही, दुसरे – पिठाची गिरणी, तिसरे -इलेक्ट्रॉनिक शेगडी, चौथे बक्षिसे गॅस शेगडी, पाचवे बक्षिसे मिक्सर, सहावे बक्षिसे कुकर, सातवे बक्षिसे इस्री, आठवे बक्षिसे इडली पात्र, नववे बक्षिसे डिनर सेट आदी प्रोत्साहनपर आकर्षक भेटवस्तू वाटप करण्यात आल्या. झी टॉकीज फेम मिमिक्री संदीप जाधव प्रस्तुत प्रश्नमंजुषा मध्ये 100 पैठणी साड्या महिलांनी जिंकल्या.

रांजणगाव ग्रामपंचायत सदस्या नंदा हरेराम बडे, भाजपा महिला जिल्हा सरचिटणीस मोहिनी दिपक बडे यांच्यासह भाजपा महिला आघाडीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परीसरातील 5 ते 6 हजार महिला, विद्यार्थ्यांनी, तरूणीची उपस्थिती होती.
