वाळूजमहानगर, ता.27 – रांजणगाव (शेणपुंजी) येथील श्री गजानन प्राथमिक व माध्यमिक विद्यामंदिर, श्री गजानन ज्युनिअर कॉलेज, बसवंतराव पाटील इंग्लिश स्कूल यांच्या सयुक्तविद्यमानाने शाळेत संविधान दिन साजरा करण्यात आला.

याप्रसंगी शाळेत संविधानचे सामूहिक वाचन करण्यात आले तसेच याप्रसंगी भारतीय संविधानाचे महत्त्व माझे संविधान माझा अभिमान, घर घर संविधान अभियान राबवण्यात आले. संविधान निर्मिती आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान या विषयावर निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली. त्याचबरोबर माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक हनुमंत जाधव व गुलाब मोहिते यांनी संविधानाबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
