
वाळुज महानगर, (ता.22)- वाळुज परिसरातील रांजणगाव येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त सकाळी 9 ते 12 शोभायात्रा, 12 ते 2 महाप्रसाद, सायंकाळी दीपोत्सव व रात्री 8 ते 10 रामायणाचार्य ह भ प वैजीनाथ महाराज थोरात हिंगोली कर यांचे कीर्तन होणार आहे.
— (प्रतिक्रिया )) —
दीपक बडे, पंचायत समिती सदस्य रांजणगाव-गेल्या 500 वर्षापासून रखडलेला हा प्रश्न मार्गी लागल्याने सकल हिंदू समाजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. हा आनंद द्विगुणित करण्यासाठी गावातील सर्व मंदिरांची रंगरंगोटी करण्यात येऊन लाइटिंग व दीपोत्सव साजरा करण्यात येत आहे.
— (प्रतिक्रिया )) —

प्रभाकर महालकर, उद्योजक – राम मंदिराचे उद्घाटन व प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा यामुळे संपूर्ण भारतभर रामोत्सव साजरा करण्यात येत आहे. रांजणगाव शेणपुंजी येथेही तो अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात येत असून साठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
