March 26, 2026

वाळूजमहानगर (ता.5) – श्री बसवंतराव पाटील प्राथमिक व माध्यमिक इंग्रजी शाळा (शे.पु.) येथे मंगळवारी (ता.4) रोजी भगवान महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष आय जी जाधव यांनी भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे पूजन केले.

याप्रसंगी विद्यार्थ्यांनी त्यांच्या भाषणाद्वारे भगवान महावीरांच्या सत्य आणि अहिंसा या शिकवणुकी विषयी अधिक माहिती दिली. त्याचप्रमाणे पंचशील मधील अहिंसा सत्य अपरिग्रह, अस्तेय, ब्रह्मचर्य याविषयी माहिती दिली.
कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष आय.जी.जाधव, श्री गजानन प्राथमिक विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका सुरेखा बस्वदे, संस्थेचे सचिव हरीश जाधव, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक एम.व्ही.शिनगारे, मीरा देशपांडे, बी व्ही शिरसाठ, रेखा बिदरकर तसेच इतर सर्व शिक्षक यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संभाजी जाधव यांनी केले तर रेखा बिदरकर यांनी आभार मानले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *