
वाळूज महानगर, (ता 29 )- वाळूज परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मनुस्मृति दहन दिनानिमित्त भारतीय स्त्री मुक्ती दिन परिषदचे आयोजन शुक्रवारी 29 रोजी करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्षा लता बामणे होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्य महासचिव अरुंधती शिरसाट, राज्य उपाध्यक्ष सविता मुंढे, मराठवाडा समन्वयक प्रज्ञा साळवे, मुख्य प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे, तर स्वागताध्यक्ष म्हणून जिल्हा उपाध्यक्ष रत्नमाला पवार व शहराध्यक्ष वंदना नरवडे आदींची उपस्थिती होती.

प्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कर्तुत्ववान महिलाच्या प्रतिमेस बहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या भारतीय स्त्री मुक्ती दिन परिषदेत उपस्थित महिला पदाधिकाऱ्यांनी वंचित बहुजन आघाडी यांच्या विषयी मनोगत व्यक्त करत मनुस्मृतिवर टीका करत भाजपाच्या मोदी सरकारवरताशेरे ओढले.तसेच भारतीय स्त्री मुक्ती दिन परिषदेचे ध्येयधोरणे स्पष्ट करून वेगवेगळे सात ठराव पारित केले. कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष प्रभाकर बकले, योगेश बन, जिल्हा उपाध्यक्ष रूपचंद गाडेकर, नितीन शेजवळ,अलका सुरडकर, सुलोचना साबळे,शितल बनकर, खुशबू शेख,साधना पठारे, संगीता अंभोरे, जया सदावर्ते, सुजाता गायकवाड, पुष्पा घोडके, आशा मोरे, संगीता अंभोरे, शालिनी बर्फे, सीमा भंडारी, वंदना खिल्लारेआदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमृता डोंगरदिवे, पंकज बनसोडे, अर्जुन अभंग, अशोक खिल्लारे, हनीफ पटेल, नितीन शेजवळ, संदीप आल्हाट, प्रकाश ससाने, सिद्दोधन गवंदे, मनीष शेळके, प्रदीप वाहुळ यांनी परिश्रम घेतले.
सात ठराव पारित –
मनुस्मृति दहन दिनानिमित्त प्रत्येक वर्षी 25 ते 29 डिसेंबर दरम्यान भारतीय स्त्री मुक्ती दिन परिषदचे आयोजन करण्यात येते. या परिषदेत वेगवेगळे ठराव घेऊन ते शासनास पाठवल्या जाते. त्याचाच एक भाग म्हणून रांजणगाव येथे आलेल्या या परिषदेत 25 डिसेंबर हा स्त्री मुक्ती दिन जाहीर करावा, राजस्थानातील उच्च न्यायालयासमोर असलेला मनुस्मृतीचा पुतळा हटवावा, महिला आरक्षण कायद्यात दुरुस्ती करावी, मणिपूर येथील महिला अत्याचाराचा निषेध, जातीय जनगणना करण्यात यावी, महिलांसाठी सुरक्षित वातावरण व गाजा पट्टीतील युद्धाचा निषेध. असे एकूण आठ ठराव घेऊन ते सूचक व अनुमोदक यासह पास करण्यात आले.

वंचित बहुजन आघाडीत प्रवेश –
या भारतीय स्त्री मुक्ती दिन परिषदेत शौकत चांद शेख, दिपाली गायकवाड यांच्यासह एम आय एम व इतर पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडी प्रवेश केला. या सर्वांचे स्वागत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
