March 23, 2026

वाळूज महानगर (ता.28)- वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मनुस्मृति दहन दिनानिमित्त भारतीय स्त्री मुक्ती दिन परिषद वाळूज परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) ता गंगापूर येथे शुक्रवारी (ता.29) डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता आयोजित करण्यात आली आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा लता बामणे, तर प्रमुख मार्गदर्शकामध्ये राज्य महासचिव तथा औरंगाबाद जिल्हा प्रभारी अरुंधती शिरसाट, राज्य उपाध्यक्ष सविता मुंढे, जळगाव जिल्हाध्यक्ष शमीभा पाटील असून प्रमुख उपस्थितीत प्रवक्ते सिध्दार्थ मोकळे, राज्य सदस्य अमित भूईगळ, मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील यांचा समावेश आहे. स्वागताध्यक्ष म्हणून शहराध्यक्षा वंदना नरवडे, जिल्हा उपाध्यक्षा रत्नमाला पवार राहणार आहे.
कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे अवाहन आयोजक जिल्हाध्यक्ष प्रभाकर बकले, योगेश बन, युवा जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड, संदीप शिरसाट, जमीन देशमुख, संदीप जाधव, तानाजी भोजने, जलीस अहमद, अफसर पठाण, कृष्ण बनकर आदींनी केले आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *