February 5, 2026

वाळूजमहानगर – वाळूज परिसरातील रांजणगाव शेणपुंजी येथे वाळूज एमआयडीसी पोलीस ठाणे छापा टाकून विनापरवाना व बेकायदेशीररित्या दारू विक्री करणाऱ्या एकाला अटक केली. त्याच्या ताब्यातून 7 हजार 840 रुपये किमतीच्या देशी दारूच्या 148 बाटल्या जप्त करण्यात आल्या. ही कारवाई गुरुवारी 22 जानेवारी रोजी सकाळी 8:30 वाजेच्या सुमारास करण्यात आली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रांजणगाव शेणपुंजी येथील आरोपी यश राजु शेजुळ (वय 21 वर्ष) हा गुरुवारी 22 जानेवारी रोजी सकाळी 8:25 वाजेच्या सुमारास रांजणगाव शेणपुंजी येथील हिदुस्तान किराणा जवळ कमळापुर फाटा येथे विनापरवाना व बेकायदेशीर रित्या देशी दारू जवळ बाळगताना मिळून आला. त्याच्या ताब्यातून पोलिसांनी भिंगरी, संत्रा लेबल असलेल्या 4000 रुपये किमतीच्या प्रत्येकी 40 रुपये प्रमाणे 100 प्लास्टीक बाटल्या तसेच प्रत्येकी 80 रुपये प्रमाणे 3 हजार 840 रुपये किमतीच्या 48 देशीदारूच्या बाटल्या असा एकूण 7 हजार 840 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलिस अंमलदार हनुमान ठोके यांच्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात कलम 65(e) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *