March 23, 2026

 

वाळूजमहानगर, (ता.6) -विनापरवाना व बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वाळुज एमआयडीसी पोलिसांनी छापा मारून 8 जुगाऱ्यांना जुगार खेळताना व खेळवितांना ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून जुगाराच्या साहित्यासह 5 हजार 200 रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला. ही कारवाई वाळूज परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथे गुरूवारी (ता.4) रोजी सायकांळी करण्यात आली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे, पोउपनि प्रविण पाथरकर यांना गुरूवारी (ता.4) रोजी सायकांळी माहिती मिळाली की, रांजणगाव (शेणपुंजी) येथे कल्याण नावाचा मटका हा जुगार सुरू आहे. त्यानंतर पोलीस पथकाने त्या ठिकाणी छापा मारला असता श्रावण तेजराव आडे, विकास रमेश सोनवणे, ऋषीकेश संदुरराव लोखंडे, लक्ष्मण तुकराम डोंगरे, अशोक तुकाराम नरवडे, शिवाजी विठ्ठल राजगुरू सर्व रा. रांजणगाव (शेणपुंजी) हे जुगार खेळतांना व खेळवितांना मिळून आले. तसेच योगेश म्हस्के, सत्यम जाधव हे जुगार खेळण्यासाठी उत्तेजन देत होते. यावेळी पोलिसांनी सर्व जुगाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेऊन 5 हजार 200 रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *