
वाळूजमहानगर, (ता.13) – रांजणगाव (शेपू) येथील श्री गजानन प्रा व मा विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, तसेच बसवंतराव पाटील प्रा व मा स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती विविध कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी आयोजन करण्यात आलेल्या आंतरशालेय क्रीडा महोत्सवात कराटे, कब्बडी, व्हॉलीबॉल या खेळांचे सामने भरविण्यात आले होते. यामध्ये रांजणगाव व बजाजनगर परिसरातील 17 शाळांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी रोख रक्कम 2 हजार 100 व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकासाठी 1 हजार 500 रुपये व सन्मान चिन्ह, तृतीय क्रमांकासाठी 500 रुपये व सन्मान चिन्ह असे बक्षिसे ठेवण्यात आले होते. त्याच बरोबर भाषण स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, नाटीका यांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना रोख बक्षीस व सन्मान चिन्ह देवुन प्रोत्साहित करण्यात आले.

या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्योजक व मसीआचे बालाजी शिंदे, संस्थेचे अध्यक्ष आय जी जाधव, संस्थेचे सचिव हरीश जाधव, श्री गजानन प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सुरेखा बस्वदे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक मष्णाजी शिनगारे, उपमुख्याध्यापिका मीरा देशपांडे, बसवंतराव पाटील प्रा व मा मुख्याध्यापक बी व्ही शिरसाट, रेखा बिदरकर, पालक प्रतिनिधी पालक प्रतिनिधी केशव पाईकराव, पूजाताई चांदणे, नारायण पांचाळ, गणेश आगलावे, सुरेश म्हस्के, प्रा संजय तुपे, दीपक कोळी, दीपक पठारे, नीलिमा रेळेकर, पूजा गिरी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
