वाळूजमहानगर, ता.26 – रांजणगाव (शेणपुंजी) येथे चोरट्यांनी धुमाकुळ घातला असून एकाच रात्रीत 8 दुकानाचे शटर उचकटून हजारोचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना बुधवारी (ता.25) रोजी सकाळी उघडकीस आली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, कमळापुर रस्त्यावरील मातोश्री काम्प्लेक्स मधील समीर बोरवले, सोनु किरणा, यशश्री ट्रेडर्स, मराठवाडा ट्रेडर्स, आई क्लिनिक. तसेच बाजूला असलेल्या प्रल्हाद कॉम्प्लेक्स मधील श्रीनाथ इंटरप्रायजेस, रुख्मणी प्रोव्हिजन अॅण्ड जॅनरल स्टोअरस, गुरूकृृृपा मेडीकल, साई गणेश मार्ट मॉल या दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्याने बुधवारी (ता.25) रोजी पहाटे 3 वाजेच्या सुमारास
आतील हजारो किमतीचा ऐवज लंपास केला.
चोरटे सीसीटीव्हीत –
चोरट्यांनी साई गणेश मार्ट मॉल येथे लोखंडी रॉडने शटरचे कुलूप तोडले. त्यानंतर आत प्रवेश करतांना काचा असल्याने त्यांना प्रवेश करता आला नाही. म्हणून त्यांनी रॉड व दगडाने काच फोडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या आवाजाने मॉलचे मालक परोडकर यांना जाग आली. त्यानंतर त्यांनी सीसीटिव्ही फुटेज पहिले असता, एक जण मॉलच्या काचेवर दगड मारतांना दिसला. त्यामुळे ते मॉल जवळ येताचे त्यांना पाहून चोरट्यांनी तेथून धुम ठोकली.
पोलीस आता तक्रार नाही –
दरम्यान रोहीत परोडकर यांनी 112 ला फोन करून माहिती दिल्याने एमआयडीसी वाळूज पोलीस घटनास्थळी दाखल होत त्यांनी आजूबाजूच्या परिसरात पाहणी केली असता, तोपर्यंत चोरटे परिसरातुन पसार झाले होते़ या प्रकरणी कोणीही तक्रार देण्यासाठी पुढे आले नाही.