March 23, 2026


वाळुज महानगर, (ता.10)-जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कर्तबगार महिलांचा तसेच कोरोना काळात अविरत सेवा देणाऱ्या अंगणवाडी सेविका अशा कार्यकर्ते व विद्यार्थ्यांचा सत्कार करून रांजणगाव (शे.पु) येथील युवा परिवर्तन व्यावसायिक प्रशिक्षण केंद्राच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
वाळुज एमआयडीसी ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक स्वाती उचित, श्रद्धा संतोष माने यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ऑपरेशन मॅनेजर
श्रीकृष्ण वानखेडे, मोहिनी बडे, रमा उबाळे, संजीवनी सदावर्ते, संगीता पंडित, कांताताई जाधव, डॉ. अर्चना शिरसाठ, पदमाताई धनवटे, नंदाई धुळे यांची प्रमुख उपस्थिती होति. यावेळी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व तसेच कोरोना काळात अविरतपणे कार्य करणाऱ्या आशा स्वयंसेविका तसेच अंगणवाडी सेविका व आजी माजी विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संचालक-प्रा. प्रमोद धुळे, दत्ता लुटे, संजीवनी नवल, अमोल कोल्हे, पूनम सोनवणे, साक्षी कांबळे, रोहिणी कोल्हे, प्रीती राठोड व दीपक सोनवणे यांनी परिश्रम घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *