
वाळूज महानगर, (ता.1) – रांजणगाव (शेणपुंजी) येथील बसवंतराव पाटील इंग्लिश स्कूल मध्ये अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथीनिमित्त प्रतिमेचे पूजन व अभिवादन करुन शनिवारी (ता.1) रोजी करण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष आय.जी. जाधव होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव हरीश जाधव, प्राथमिक मुख्याध्यापिका सुरेखा बस्वदे, माध्यमिक मुख्याध्यापक भाऊसाहेब शिरसाठ व प्राथमिक मुख्याध्यापिका रेखा बिदरकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्याबद्दल भाषणातून मनोगत व्यक्त केले. तसेच सहशिक्षिका दीप्ती झाडे यांनी सूत्रसंचालन करुन अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्याबद्दल माहिती सांगितली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हनुमान जाधव, निलेश मिसाळ, प्रीती नरवडे, लता वैष्णव, सोनी शुक्ला, पूजा खोतकर, पूजा ठाकूर, ममता खोतकर, सुरेखा शिंदे, अंकिता गोरे, विजया पवार यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे नियोजन रेखा बिदरकर यांनी केले. तर आभार संभाजी जाधव यांनी मानले.
