
वाळुजमहानगर (ता.3) – ड्युटी संपवून घरी जात असताना भरधाव आलेल्या एका कारने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात सुरक्षारक्षक गंभीर जखमी झाला. हा अपघात सोलापूर धुळे महामार्गवरील साजापूर जवळ मंगळवारी 2 डिसेंबर रोजी सायंकाळी झाला.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अशी की, गुजरात येथील कृष्णा रन खडका (वय 28 वर्षे) हा हॉटेल इंडियन ढाबा येथे कुक असून तो वाळूज परिसरातील साजापूर येथे आई कोकीळा, वडील रन सरजन खडका, भाऊ पुरन आणि पत्नी आरती यांच्या राहतो. त्याचे वडील रन खडका हे त्याच ढाब्यावर सेक्यरिटी म्हणुन काम करतात. मंगळवारी 2 डिसेंबर रोजी सायंकाळी 5:30 वाजेच्या सुमारास रन खडका हे हॉटेल इंडियन ढाबा येथून ड्युटी संपवुन घरी जात असतांना धुळे सोलापुर हायवे रोड क्रॉस करत असतांना एका पांढ-या रंगाची आय -20 होंडाई कंपनी (एम एच 20, एफ जी -4000) या वाहनाचे चालकाने जोराची धडक दिली. या अपघातात खडका है गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारार्थ शफिक शेख यांनी दाखल केले. घाटी दवाखाना येथील वार्ड क्र. 17 मध्ये अतिदक्षता विभागात औषधोपचार सुरु आहे. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
