April 8, 2026

 

वाळुजमहानगर, (ता.8) – भुमीअभिलेख नकाशानुसार असलेला तुर्काबाद ते कासोडा हा सरकारी रस्ता अडवून रस्त्यात अडथळा निर्माण केल्याने संतप्त शेतकऱ्यांनी बुधवारी 8 एप्रिल रोजी पोलिसात धाव घेत रस्ता मोकळा करून देण्याची विनंती केली.

याबाबत तुर्काबाद (खराडी) ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर येथील शेतकरी गजानन जनार्धन कोतकर, शिवनाथ कडु सोनवणे यांनी वाळूज पोलिसांना दिलेल्या लेखी निवेदनात असे म्हटले आहे की, तुर्काबाद शिवारातील गट नं. 15 व गट नं. 7 मधुन कासोडा मार्गे पुढे जाणारा सरकारी रस्ता आहे. विशेष म्हणजे हा रस्ता पूर्वीपासून असून तो भूमी अभिलेख नकाशावर दर्शविलेला आहे.

हा रस्ता तुर्काबाद पंचक्रोशीतील गावकरी, शेतकरी यांना शेत मशागत करण्यासाठी, शेतमाल ने आण करण्यासाठी तसेच कासोडा व पुढे वाळूज औद्योगिक वसाहतीत व एकलहेरा, नांदेडा, दौलताबादकडे जाण्यायेण्यासाठी सोयीचा आहे.

मात्र तुर्काबाद (खराडी) येथील अंकुश भिकाजी जाधव, सचिन भाऊसाहेब जाधव, सुदाम भानुदास जाधव यांनी काही कारण नसतांना हा रस्ता अडवला. व रस्त्यावरून जाण्या-येण्यास मनाई केली. तसेच रस्त्यावर बेकायदेशीररित्या पाणी सोडुन रस्ता नाहीसा करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तुर्काबाद (खराडी) येथील शेतकऱ्यांनी बुधवारी 8 एप्रिल रोजी वाळूज पोलीस ठाण्यात धाव घेत निवेदन देऊन रस्ता मोकळा करून देण्याची विनंती केली.

या निवेदनावर रामहारी नवनाथ सोनवणे, लक्ष्मण माणिक शिरसाठ, कारभारी जयराम कोतकर, योगेश अशोक तोडकर, कचरू सुर्यभान पाटेकर, शिवाजी माणिक कोतकर, हमीद रज्जाक शेख, पुरूषोत्तम सुखदेव शेळके, सोपान केशव पानकर, सोमनाथ रखमाजी कोतकर, प्रदिप सुभाष सामसे, पोपट बबन सामसे, बाबासाहेब माणिक कोतकर, कृष्णा रामदास कोतकर आदींची नावे व स्वाक्षऱ्या आहेत.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *