
वाळूज महानगर, (ता.13) – बजाजनगर येथील युरेका इन्फोसिस स्कूलची शैक्षणिक सहल 9 व 10 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली होती. या सहलीत विद्यार्थ्यांनी धार्मिक व ऐतिहासिक शिदोरी परतीच्या प्रवासात सोबत आणली.
सहलीची सुरुवात मोरगाव येथील मोरेश्वर गणेश दर्शनाने झाली. पुढे सातारा पासून 18 किलोमीटर अंतरावर असलेल्या सज्जनगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचे अध्यात्मिक गुरु समर्थ रामदास स्वामी यांचे अंतिम विश्रांती स्थान. तसेच येथे पंचधातूंचे भगवान राम मंदिरही आहे. महाबळेश्वर, पाचगणी येथील मॅप्रो गार्डन, टेबल लँड या प्रेक्षणीय स्थळांचा मुलांनी आनंद घेतला. यावेळी मुलांनी घोडा गाडीचाही आनंद लुटला. वाई येथील ढोल्या गणपती व काशी विश्वनाथ मंदिरचे दर्शन घेतले. विद्यार्थ्यांनी सहलीचा आनंद मनसोक्त लुटला. या सहलीमध्ये अभ्यासासोबत आठवणी संस्कार आणि अनुभवाची शिदोरी घेऊन परतलेली ही सहल मुलांच्या कायम स्मरणात राहणारी ठरली. ही सहल यशस्वी होण्यासाठी शाळेच्या प्राचार्या प्रज्ञा कोराने तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
