
वाळुज महानगर, (ता.5)- वाळूज येथील मेटलमॅन ऑटो प्रा. लि. कंपनीत स्किल इंडिया अंतर्गत सरकार मान्य प्रशिक्षण केंद्रचा उद्घाटन सोहळा मेटलमॅन ऑटो प्रायव्हेट लिमिटेडचे सीओओ श्रीकांत मुंदडा यांच्या हस्ते व छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त सुरेश वराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी (ता.4) रोजी मोठ्या उत्साहात झाला. 
यावेळी बजाज ऑटोचे पंकज शिंपी, मेटल मॅन ऑटो कंपनीचे प्लांट हेड अनिलकुमार डहाळे,
कार्पोरेट एच आर आथिया युसुफ, एच आर हेड विजय साळवे, वेंडर डेव्हलपमेंटचे सूर्यकांत शानबाग, व्यवस्थापक प्रविण जोशी, योगेश पवार, राम राठोड, प्रकाश साळुंके, उपस्थिती होते. 
यावेळी सरकार मान्य प्रशिक्षण घेतलेल्या मकरंद निखाडे, विकास शिंदे, सागर पाटील, जितेंद्र पाटील, सचिन पवार, अशोक गुट्टे, दिनेश लाडे या नवीन ट्रेनर यांचा सर्टीफिकेट देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी आशिष चोरडिया, विनोद वानखेडे, सुशील देवळे, सचिन घोडके, विश्वनाथ देशपांडे, संजय घुगे, इम्रान मिर्झा यांनी प्रयत्न केले. अथिया युसुफ यांनी सूत्रसंचालन केले. तर कृष्णकुमार बीजामवार यांनी आभार मानले.

सर्वांगीण विकास हेच प्रमुख ध्येय –
स्किल इंडिया इनिशिएटिव्ह अंतर्गत सरकार मान्यताप्राप्त हे प्रशिक्षण मेटलमॅन ऑटो प्रायव्हेट लिमिटेड आणि महाराष्ट्र शासन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे. उद्योगाच्या गरजेनुसार, नवीनतम तंत्रज्ञान आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रम श्रेणीसुधारासह शिक्षणाचा दर्जा राखण्याचे कंपनीने सुनिश्चित केले आहे. त्या अंतर्गत बेरोजगार, सामान्य कामगारांचे कौशल्य विकास करून त्यांचा सर्वांगीण विकास करणे हे प्रमुख ध्येय आहे. 
नोकरी आणि व्यवसायात मदत –
हे प्रशिक्षण सरकार मान्यताप्राप्त असून सहभाग घेणाऱ्यास प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. जे एखाद्या विशिष्ट व्यापार किंवा कौशल्यातील तुमचे कौशल्य आणि ज्ञान प्रमाणित करते. हे प्रमाणपत्र तुम्हाला नोकरी मिळविण्यात, तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास किंवा चांगला पगार मिळविण्यात मदत करू शकते. या प्रशिक्षणास प्रवेश घेतल्यानंतर ते यशस्वीरीत्या पूर्ण करणे आणि प्रशिक्षणानंतर किमान 6 महिने रोजगार, स्वयंरोजगार करणे हे प्रशिक्षणार्थीस बंधनकारक असेल. अशी माहिती कंपनीच्या वतीने देण्यात आली.
