
वाळूज महानगर, (ता.28) – छत्रपती संभाजीनगर शहरातील नामांकित उद्योग समूह मेटलमन ऑटो लिमिटेड च्या वतीने आयोजित वार्षिक आंतर-प्लांट क्रिकेट स्पर्धेत (मेटलमन प्रीमियर लीग 2025-26) ‘सनराईज बी 31’ संघाने विजेतेपदावर आपले नाव कोरले.

खेळामुळे सांघिक भावना, शिस्त आणि नेतृत्वगुण विकसित होतात हा विचार रुजवण्यासाठी दरवर्षी मेटलमन ऑटो लिमिटेड च्या वतीने आयोजित वार्षिक आंतर-प्लांट क्रिकेट स्पर्धेत (मेटलमन प्रीमियर लीग) या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून या स्पर्धा घेण्यात आल्या. सुंदरबन स्टेडियमवर घेण्यात आलेल्या या स्पर्धेत यावर्षी स्पर्धेत एकूण 11 संघांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता.
स्पर्धेचे निकाल :-
• विजेता संघ: सनराईज बी 31
• उपविजेता संघ: बी 30 स्ट्रायकर्स,
• द्वितीय उपविजेता: ईडी योद्धा बी 12.
या क्रिकेट स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना ‘मॅन ऑफ द मॅच’, ‘मॅन ऑफ द सीरिज’, ‘सर्वोत्कृष्ट फलंदाज’ आणि ‘सर्वोत्कृष्ट गोलंदाज’ असे वैयक्तिक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

या मान्यवरांची होती उपस्थिती :-
या सोहळ्यासाठी मुख्य अतिथी म्हणून मेटलमन ऑटो लिमिटेडचे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ( सी ओ ओ) श्रीकांत मुंदडा उपस्थित होते. त्यांच्यासोबत असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट अनिलकुमार डहाळे, सिनियर जनरल मॅनेजर आशिष शर्मा, प्लांट हेड कृष्णकुमार बिजामवार, एच आर आणि आय आर हेड विजय साळवे आणि भारतीय कामगार सेनेचे विभागीय चिटणीस प्रभाकर मते पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

नियोजन आणि संयोजन :-
स्पर्धेचे सूत्रसंचालन गुरुदास पराते यांनी केले, तर आभार विजय साळवे यांनी मानले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी क्रिकेट कमिटीसह गोरख घोटेकर, दिनेश करमाळकर, विनोद वानखेडे, रंगनाथ गायकवाड, सोमिनाथ कुबेर, प्रकाश सोळंके, राजेश मानकर, दीपक भोसले, मकरंद निखाडे, किशोर जगताप, नागेश देशमुख, अमोल बाहुले, काकासाहेब केरे, रवींद्र पेटशिवणीकर, भगवान माने, जगदीश जाधव, श्रावण ढोले यांनी विशेष परिश्रम घेतले.
“हार-जीत हा खेळाचा भाग आहे, परंतु त्यातून शिकून पुन्हा जोमाने उभे राहणे महत्त्वाचे आहे,” अशा भावना व्यवस्थापनातर्फे व्यक्त करण्यात आल्या.
