March 23, 2026

वाळुज महानगर, (ता.25)- मृत्तावस्थेत आढळलेल्या एका चाळीस वर्षीय इसमाची ओळख अद्यापही पटली नसून त्याचा मृतदेह घाटीत आहे. 22 एप्रिल रोजी दुपारी 3:15 वाजेच्या सुमारास आढळलेल्या या मृताची ओळख पटवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.


याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शेंद्रा फाटा छत्रपती संभाजीनगर येथे एक अनोळखी अंदाजे 40 वर्षीय पुरुष जातीचा मृतदेह 22 एप्रिल रोजी दुपारी 3:15 वाजेच्या सुमारास मिळून आला. याबाबत पोलीस ठाणे चिकलठाणा येथे अमृन. 39/2025 कलम 194 बी एन एस एस प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.

मयत अनोळखी इसमाचे वर्णन असे –
अनोळखी (नाव पत्ता माहित नाही).
वय अंदाजे 40 वर्षे, लांबट चेहरा, सरळ नाक, कान टोचलेले, दाढी मिशी वाढलेली (फ्रेंच स्टाईल दाढी), डोळे उघडया स्थितीत व निस्तेज, अंगात केशरी रंगाचा फुल बाहयाचा असलेला शर्ट, बटन उघडे, हिरव्या रंगाची अंडर पँट. शरीर बांधा सडपातळ, रंग काळा सावळा, उंची 5 फुट 6 इंच अंदाजे, केस काळे, कमरेस लाल रंगाचा करदोरा. अशा वर्णनाच्या अनोळखी मयत इसमाबाबत कोणास काही माहिती असेल तर चिकलठाणा पोलिसांशी संपर्क साधावा. असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक सतीश पंडित यांनी केले आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *