वाळूजमहानगर, ता.16 – वाळुज औद्योगिक वसाहतीतील इंडोरन्स कंपनी ते दिव्या इंडस्ट्रीजपर्यंत मालवाहतूक करणारी गाडी 1 लाख रुपये किमतीची गाडी इंडोरन्स कंपनी समोरून अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. ही घटना शुक्रवारी (ता.15) रोजी सकाळी उघडकीस आली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अशोक लक्ष्मण पांढरे रा. रांजणगाव याची 1 लाख रुपये किमतीची टाटा एसी (एम एच 04, डीएस- 3870) ही चारचाकी मालवाहतूक गाडी वाळूज औद्योगिक वसाहतीतील इंडोरन्स कंपनी ते दिव्या इंडस्ट्रीज पर्यंत लोखंडी पाईपची वाहतूक करते. ही गाडी गुरुवारी (ता.14) रोजी नेहमीप्रमाणे इंडोरन्स कंपनीस जवळ उभी केली असता, ती रात्रीतून लंपास केली. ही घटना शुक्रवारी (ता.15) रोजी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.