
वाळूजमहानगर, (ता.11) – बजाजनगर येथील दगडोजीराव देशमुख महाविद्यालयातील मानसशास्त्र विभागाच्या वतीने अभ्यास दौऱ्याचे आयोजन करून पाटोदा येथील स्वयंसिद्ध मतिमंद मुलांच्या शाळेला भेट दिली. यावेळी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मतिमंद विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच त्यांच्या स्वावलंबी बनण्याचे कौशल्य जाणून घेतले.
या प्रसंगी स्वयंसिद्ध संस्थेचे सचिव कमलेश भाले यांनी संस्थेविषयी माहिती सांगितली. अधीक्षक प्रशांत चाबुकस्वार यांनी विद्यार्थ्यांना मतिमंदत्व म्हणजे काय व मतिमंदत्वाचे विविध प्रकार किंवा पातळ्या याविषयी विस्तृत माहिती दिली. खत्री मॅडम यांनी मतिमंद मुलांना स्वावलंबी बनवण्यासाठी कसे वेगवेगळे कौशल्य शिकवले जाते. या विषयी माहिती दिली. मानसशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी शाळेतील वेगवेगळ्या विभागांना भेटी विद्यार्थ्यांची ओळख करून घेत त्यांच्याशी सुसंवाद साधला. या अभ्यास भेटीसाठी विद्यार्थ्यांसोबत मानशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अनिल वाघ व डॉ. पिराजी डुमनर होते.
