
वाळूजमहानगर, ता.28 – ऑक्टोंबर 24 मध्ये झालेल्या चार्टर्ड अकाउंटंट च्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेत वाळूज येथील मानव कमल कासलीवाल याने घवघवीत यश मिळवत खडतर परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास झाला.
वाळूज शहरातून ही परीक्षा पास होणारा केवळ तिसरा भूमिपुत्र विद्यार्थी ठरला आहे. या यशाबद्दल त्याचे आई वडील संगीता कमल कासलीवाल, काका काकी शर्मिला मनोज कासलीवाल, आजी शकुंतला कासलीवाल, मित्तल मनोज कासलीवाल, हिरोशी ललित बोहरा, समय कासलीवाल, सफल कासलीवाल आदींसह विविध स्तरातील नागरिकांच्या वतीने त्याचे स्वागत व कौतुक होत आहे.
