February 4, 2026

वाळूजमहानगर, (ता.3) – फुलंब्री येथे नुकत्याच झालेल्या आंतर विद्यापीठ स्पर्धेमध्ये वाळुज येथील मात्सूतासू ओयामा तायक्वांदो स्पोर्ट अकॅडमीच्या खेळाडूने अंतर महाविद्यालयीन स्पर्धेमध्ये अरुण म्हस्के या खेळाडूने सुवर्णपदक मिळवून अखिल भारतीय विद्यापीठ राष्ट्रीय स्पर्धेत निवड निश्चित केली आहे.

फुलंब्री येथे झालेल्या मात्सूतासू ओयामा तायक्वांदो स्पर्धेत
अरुण म्हस्के या खेळाडूने बीड, औरंगाबाद व जालना येथील विद्यार्थी खेळाडूंवर मात करत विजय मिळवून अखिल भारतीय राष्ट्रीय खेळासाठी निवड निश्चित केली.
अमृतसर पंजाब येथे अखिल भारतीय राष्ट्रीय स्पर्धा 4,5,6 जानेवारी दरम्यान होत आहे. यासाठी या स्पर्धेसाठी तो 1 जानेवारी 2023 रोजी अमृतसर पंजाब येथे रवाना होत आहे. अशी माहिती मात्सूतासू ओयामा तायक्वांदो स्पोर्ट अकॅडमीचे प्रशिक्षक प्रा.डॉ.भरतसिंग सलामपुरे यांनी दिली.


अरुण म्हस्के हा खेळाडू देवगिरी महाविद्यालयाचा असून तो ग्रामीण भागातील मात्सूतासू ओयामा तायक्वांदो स्पोर्ट अकॅडमी वाळूज येथे प्रशिक्षण घेत आहे. या खेळाडूला प्रा.डॉ.भरतसिंग सलामपुरे, प्रा. डॉ.सचिन राय व तसेच संस्थेचे अध्यक्ष मोहनसिंग सलामपुरे, अमर घुले, उपेंद्र राय, यांचे मार्गदर्शन लाभले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *