वाळूजमहानगर – बजाजनगर ते पंढरपूर दरम्यान बजाज विहार समोर बेशुद्ध अवस्थेत मिळून आलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र तिची ओळख अद्यापही न पटल्याने याबाबत कोणास काही माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आली आहे.
बजाजनगर येथील महावीर चौक ते ओएसीस चौक पंढरपूर दरम्यान बजाज विहार येथे रोडवर बेशुध्द अवस्थेत एक महिला मिळुन आली होती. त्या महिलेस विकास बोबडे यांनी घाटीत पुढील उपचारकामी आणून दाखल केले. अपघात विभागामध्ये तीच्यावर औषधोपचार चालु असताना ती रविवारी (ता.27) रोजी 11 वाजेच्या सुमारास मयत झाल्याचे घोषीत केले आहे. अनोळखी असलेल्या या महिलेचे वर्णन असे रंग सावळा, वय अंदाजे 35, मजबूत बांधा, नाक सरळ, चेहरा गोल, केस मध्यम काळे, अंगात साडी. या महिलेबाबत काही माहीती मिळुन आल्यास एमआयडीसी पोलीस ठाण्याशी (फोन 0240-2240559) किंवा पोलीस हवालदार राजेंद्र उदे – 9823704949 यांच्याशी संपर्क करावा. असे आवाहन करण्यात आले.
