वाळूज महानगर –
वाळूज येथे गेल्या एक महिन्यापासून पाणीपुरवठा होत नसल्यामुळे नागरिकांना सणासुदीच्या काळात कामाला दांडी मारून पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यामुळे वाळुज येथील अण्णाभाऊ साठेनगरात पाण्यासाठी त्रस्त नागरिकांनी बी पॅंथरचे जिल्हाध्यक्ष अशोक श्रीखंडे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतवर शनिवारी (ता.3) आगस्ट रोजी हंडा मोर्चा काढण्यात आला. यावेळी पाणी द्या, नसता खुर्च्या खाली करा. अशा घोषणा देण्यात आल्या.
वाळूज ग्रामपंचायतच्या पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांचा गेल्या चार महिन्यांपासून पगार रखडला. शिवाय पीएफ सुध्दा भरला नाही. त्यामुळे या पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले होते. परिणामी वाळूज येथे सुमारे महिन्याभरापासून पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. काही नागरिकांनी खाजगी टँकर बोलावून काम भागते केले. मात्र हातावर पोट असलेल्या नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यासाठी वेळप्रसंगी कामला सुध्दा दांडी मारावी लागते आहे. त्यामुळे वाळुज येथील अण्णाभाऊ साठेनगरात पाण्यासाठी त्रस्त नागरिकांनी बी पॅंथरचे जिल्हाध्यक्ष अशोक श्रीखंडे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतवर शनिवारी (ता.3) आगस्ट रोजी हंडा मोर्चा काढण्यात आला. यावेळी ग्रामपंचायतच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांना या मोर्चेकर्यांनी चांगलेच धारेवर धरत पाणी द्या, नुसता खुर्च्या खाली करा. अशा घोषणा दिल्या.
अण्णाभाऊ साठेनगर ही दलित वसाहत असल्यामुळे रस्ते, पाणी, ड्रेनेजलाईन या समस्या अत्यंत बिकट बनत आहे. पाणी प्रश्न बाबत ग्रामविकास अधिकारी उत्तम भोंडवे यांनी मात्र पाईपलाईन टाकण्याचे काम चालू आहे, एक-दोन दिवसात पाणी प्रश्न निकाली लागेल. असे आश्वासन दिल्याचे अशोक श्रीखंडे यांनी सांगितले.

तीव्र आंदोलन छेडणार –
वरिष्ठ अधिकारी यांनी येथील गंभीर पाणी प्रश्न, रस्ते, ड्रेनेजलाईन या समस्या सोडवाव्या. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक श्रीखंडे, लतीफ पटेल, सुनील चिकसे, शालुबाई पवार, अलकाबाई हिवाळे, सविता शेजवळ, कांचनबाई पठारे, सुगंधा श्रीखंडे, मंगल श्रीखंडे, सविता साबळे, रंजनाबाई पंडित, नंदाबाई दाणे ,कचराबाई भगुरे, स्वाती गडवे, ज्योती भिवसने यांच्यासह इतर महिलांनी दिला.
