
वाळुज महानगर (ता.31) – महाविकास आघाडीची छत्रपती संभाजीनगर येथे येत्या दोन एप्रिल रोजी विराट सभा होत आहे. या सभेच्या पूर्वतयारीसाठी वाळूज महानगरातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी कंबर कसून घरोघरी जाऊन सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन शुक्रवारी (ता.31) रोजी केले.
———————–
वाळुज महानगरात वन बीएचके फ्लॅट किरायाने पाहिजे. तात्काळ संपर्क करा – 99 23 27 63 66
——————
महाविकास आघाडीच्या रविवारी (ता.2) एप्रिल 2023 रोजी सांस्कृतिक मंडळ, छत्रपती संभाजीनगर येथे होणार्या विराट सभेला लाखोंच्या संख्येने हजर राहण्यासाठी वाळुज महानगरातील महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष दुकान, बाजार, मार्केट, बस स्टॉंड, रिक्षा स्टँड, तसेच घरोघरी जाऊन प्रचार केला.
तसेच सभेला लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्यासाठी नागरिकांना नम्रपणे आवाहन केले. यावेळी वाळूज महानगर काँग्रेसचे अध्यक्ष अर्जुन आदमाने, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विभागप्रमुख सुदाम भंडे, काँग्रेसचे पश्चिम तालुका उपाध्यक्ष सिद्राम पारे, बसगोंडा पाटील आणि नागरिक उपस्थितीत होते.
