March 23, 2026


वाळुज महानगर, (ता.31) – श्री महालक्ष्मी गौरी गणपती उत्सव आज रविवार 31 ऑगस्ट पासून सुरू होत आहे. पारंपरिक रीतीने काही परिवारात महालक्ष्मी उत्सव मोठ्या धार्मिकतेने व उत्साहात साजरा करण्यात येतो. या उत्सवाची तयारी गेल्या 15 दिवसापासून या कुटुंबांनी सुरू केली असून गेल्या तीन दिवसापासून महालक्ष्मी गौरी पूजन उत्सवाचे साहित्य खरेदी करण्यासाठी पंढरपुरातील दुकानात खरेदिदारांची गर्दी झाली.

महालक्ष्मी गौरीच्या आगमनाचा रविवारी 31 रोजी सायंकाळी 5.27 मिनिटांपर्यंत मुहूर्त असून सोमवारी गौरीपुजन व नैवद्य अर्पण करण्यात येईल. मंगळवारी रात्री महालक्ष्मीचे विसर्जन करण्यात येणार आहे. पंढरपुरातील गेल्या 15 वर्षापासुन महालक्ष्मीचे मुखवटे, साड्या, कापडी हात, कोठ्या, बाळाचे ड्रेस आदी सर्व साहित्याचे विक्रेते शोभाबाई, भाऊसाहेब, अशोक, मंजुषा, अमृता, रोहित, व अश्विनी हे अंदुरे कुटुंबीय ग्राहकांच्या सेवेत दरवर्षी या काळात व्यस्त असतात. या कुटुंबीयांनी सांगितले की, पूर्वी लोखंडी पत्र्यांपासून तयार करण्यात आलेल्या महालक्ष्मीच्या कोठ्या( धड) लोखंडी पत्र्यापासून तयार करण्यात येत होत्या. आता फायबरच्या कोठ्या तयार करण्यात आल्या असून लोखंडा ऐवजी फायबरची कोठी खरेदीसाठी ग्राहक पसंती देत आहेत.

अमरावती येथील खळींच्या मुखवट्याला ग्राहकांची प्रथम पसंती आहे. परंतु हे मुखवटे इतर मुखवट्यापेक्षा किमतीने जास्त आहेत. सोलापूर, यवतमाळ, कोल्हापूर येथून महालक्ष्मीचे मुखवटे हात, महालक्ष्मीच्या बाळाचे ड्रेस महालक्ष्मीच्या साड्या व आवश्यक साहित्य विक्रीसाठी आणण्यात आले आहे. गेल्या पंधरा दिवसापासून ग्राहकांची खरेदीसाठी लगबग सुरू असून आज ग्राहकांची मोठी गर्दी असल्याचे अंदुरे कुटुंबीयांनी सांगितले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *