March 23, 2026

 

वाळूज महानगर – अवैध मुरूम उत्खननानंतर झालेल्या खड्ड्यात बुडून मयत झालेल्या चार मुलांच्या कुटुंबीयांची खासदार संदिपान भुमरे यांनी बुधवारी 8 ऑक्टोंबर रोजी सकाळी भेट घेऊन त्यांचे सात्वन करत त्यांना शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.


गंगापूर तालुक्यातील लिंबेजळगाव येथील गायरान जमिनीत मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन करून हजारो ब्रास मुरमाची चोरी केली. त्यामुळे लिंबेजळगाव येथील टेंभापुरी मध्यम प्रकल्पाजवळ अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. अशाच एका खड्ड्यातील पाण्यात दोन ऑक्टोबर रोजी दसरा सर्वांना निमित्त ट्रॅक्टर धुण्यासाठी गेलेल्या चार मुलांचा पुण्यात बुडून मृत्यू झाला. इरफान इसाक शेख, इम्रान इसाक शेख, जेहान हयाद पठाण व व्यंकतेश दत्तू तारक अशी या मयत मुलांची नावे आहेत. महसूल विभागाच्या सोयीस्कर दुर्लक्षामुळे घडलेल्या या दुर्घटनेमुळे मयत मुलांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परिणामी या घटनेमुळे लिंबेजळगाव परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान जिल्ह्याचे खासदार संधी आणि भुमरे यांनी बुधवारी 8 ऑक्टोंबर रोजी सकाळी मयत मुलांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सात्वन केले. तसेच त्यांना शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

 

यावेळी गंगापूर तालुक्याचे माजी आमदार अण्णासाहेब माने, शिवसेना तालुकाप्रमुख दिलीप निरपळ, उपजिल्हाप्रमुख दिलीपसिंग राजपूत, गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सचिन काकडे, संचालक डॉ. ज्ञानेश्वर नीळ, ताराचंद दुबिले, जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती मनोज जैस्वाल, पंचायत समितीचे माजी सभापती अरुण रोडगे, युवासेना उपजिल्हाप्रमुख संतोष आरगडे, तालुका उपाध्यक्ष मुन्ना गवळी, लिंबे जळगावचे सरपंच नवनाथ वैद्य, कासोडाचे सरपंच संदीप मनोरे, माजी ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार राऊत, मनोज साबळे, नंदू वाणी, शाखा प्रमुख अरुण दाणे, कृष्णा फरकांडे, नवनाथ निरफळ, शेख जावेद आदींची उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *