March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.13) – बजाजनगर येथील भोंडवे पाटील पब्लिक स्कूलमध्ये 12 जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली अवमानाची पहार काढून, ज्या मातेने गुलामगिरीच्या छाताडावर प्रहार करत, शिवबा सारखे रत्न या महाराष्ट्राला दिले. त्या माऊलीची यशोगाथा विद्यार्थ्यांना समजावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर स्वामी विवेकानंद यांच्या तेजस्वी, त्यागी व योगी वृत्तीचे दर्शन विद्यार्थ्यांना घडावे म्हणून स्वामी विवेकानंद यांचे विचार देखील या जयंतीनिमित्त सांगण्यात आले. हा कार्यक्रम सकाळच्या परिपाठात इयत्ता तिसरी व दुसरीतील विद्यार्थ्यांकडून सादर करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांपैकी काही प्रातिनिधिक विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची वेशभूषा साकारून त्यांचे विचार विद्यार्थ्यांना सांगितले. तर काही विद्यार्थ्यांनी मराठमोळ्या गीतावर नृत्य करत महाराष्ट्राची सांस्कृतिक वैशिष्ट्ये आपल्या नृत्यातून सादर केली. त्याचबरोबर राजमाता जिजाऊंनी दिलेल्या न्यायदानाचे नाटकातून व पोवाड्यातून प्रभावी सादरीकरण करत सर्वांना प्रभावित केले. त्यानंतर शाळेचे अध्यक्ष हनुमान भोंडवे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांनी त्या काळात जन्म घेऊन भारताच्या उज्ज्वल भविष्याचा वेध घेत आपले कार्य अजरामर केले. आपण देखील सर्वांनी त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन हा भारत देश संपूर्ण जगात महासत्ता कसा होईल यासाठी नेहमी कटिबद्ध असावे.
कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक रवी दाभाडे, उपमुख्याध्यापक शर्मिष्ठा दत्ता, समन्वयक राणी सावंत, समन्वयक गेहना शादिजा, शिक्षक व विद्यार्थी तसेच पालक बहुसंख्येने उपस्थित होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *