वाळूजमहानगर, ता.16 – कार्तिकी एकादशीनिमित्त विठू माऊलीच्या दर्शनासाठी आलेल्या 50 वर्षीय भाविकांचा खिसा कापून अज्ञात चोरट्यांनी 10 हजार रुपये लंपास केले. ही घटना मंगळवारी (ता.12) रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास पंढरपूर येथे घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रघुुनाथ तेजराव शिंदे रा. अविनाश कॉलनी, वाळूज हे मंगळवारी (ता.12) रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास कार्तीकी एकादशी निमित्त पंढरपुर येथे दर्शनासाठी आले होते. त्यांनी रांगेत उभे राहून विठू माऊलीचे दर्शन घेतले. त्यानंतर ते बाहेर आले असता, त्याच्या खिशातील 10 हजार रुपये अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचे उघडीकस आले. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात खिसा कापणाऱ्या अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.