
वाळूज महानगर, (ता.31) – छत्रपती संभाजीनगर येथील आर्मी कॅम्पमधील देशाचे रक्षण करणारे भारतीय जवान यांना त्याचबरोबर वाळूज एमआयडीसी वाळूज पोलिसांसोबत राखी बांधून श्री गजानन विद्या मंदिर व बसवराज पाटील इंग्लिश स्कूल या शाळेचे विद्यार्थिनी रक्षाबंधनाचा सन साजरा केला. यावेळी पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करून त्यांचे कौतुक केले. याप्रसंगी विशेषतः शाळेतील स्काऊट गाईड च्या विद्यार्थिनीचा संघ सुद्धा उपस्थित होता. 
त्याचप्रमाणे शाळेत सुद्धा विद्यार्थ्यांनी यांनी स्वतः राखी बनवून ती मुलांना बांधून, वर्गशिक्षक यांनी परंपरेनुसार राखी पौर्णिमा याचे महत्त्व सांगितले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष आय जी जाधव, मुख्याध्यापिका सुरेखा बसवदे, संस्थेचे सचिव हरीश जाधव, माध्यमिक चे एम.वी.शिनगारे, मुख्याध्यापक बी व्ही शिरसाट, प्राथमिकचे रेखा बिदरकर, हनुमान जाधव, छाया वाघदरे, सौरभ लगड यांची उपस्थिती होती.
