March 23, 2026


वाळुज महानगर, (27) – तुर्काबाद (खराडी) येथील जिल्हा परिषद शाळेत भारतीय संविधान विषयी कार्यशाळा घेण्यात आली. कार्यक्रमास तुर्काबादचे उपसरपंच सुदर्शन प्रेमभरे, पंचायत समितीच्या माजी सभापती ज्योती गायकवाड, तालुका समता परिषदेचे अध्यक्ष मोहन सोनवणे, भारतीय जनता पार्टीचे ओबीसी नेते कारभारी चोरमारे, जिल्हा परिषद प्रशालेचे मुख्याध्यापक सुदाम गायकवाड, शालेय कमिटीचे अध्यक्ष नितीन नाडे, ग्रामसंघाचे अध्यक्ष वंदना पवार, संविधान कार्यशाळेचे प्रशिक्षक अविनाश गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.


प्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व भारतीय संविधानाचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. भारतीय संविधानाविषयी समता बंधुता न्याय व नागरिकत्व याबद्दल सविस्तर माहिती यावेळी देण्यात आली. याप्रसंगी भारतीय संविधानाची चित्रफीत सुद्धा दाखवण्यात आली. दरम्यान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जन्मशताब्दी निमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेचे बक्षीस वितरणही या कार्यक्रमात करण्यात आले. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व रोख रकमेसह विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनुलोम संस्थेचे श्रीकांत नवपुते, ग्रामोदय संस्थेचे प्रज्ञेश गायकवाड, वैशाली भुजंग, अरुणा पाटेकर, सुनीता तोडकर, जिल्हा परिषद प्रशालेतील शिक्षक व शिक्षिका तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची उपस्थित होती. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *