March 23, 2026


वाळुज महानगर, (ता.1) – भारतीय जनता पार्टीच्या गंगापूर तालुका उपाध्यक्षपदी पिंपरखेडा येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन जनार्दन कचरू चनघटे यांची नियुक्ती करण्यात आली. भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष संजय खंबायते व गंगापूर तालुकाध्यक्ष सुरेश शिंदे यांनी ही नियुक्ती केली.


या नियुक्तीबद्दल जनार्दन चनघटे यांचे
गंगापूर खुलताबाद तालुक्याचे आमदार प्रशांत बंब, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य किशोर धनायत, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक नंदकुमार गांधीले पाटील, भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, अशोक हिवाळे, जनार्धन गांधीले, अमोल शिंदे, सचिन मुंडे, अशोक काकडे, नामदेव इले, गणेश सुरडकर, रामेश्वर गवळी, धोंडीराम होले, नंदू जगताप, रामदास आलोणे, मोहन सोनवणे, शंकर पारधे, श्रीराम बोचरे, चेतन बोरुले, किरण श्रीखंडे, अविनाश गायकवाड, रुपेश नाडे, सुरज बत्तीशे आदींनी स्वागत करून शुभेच्छा दिल्या आहेत.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *