March 23, 2026

 

वाळूजमहानगर, (ता.30) – शाळेत शिकत असताना व लग्न झाल्यानंतर सुद्धा आत्याच्या पती (मामा) ने वेळोवेळी जवळीक साधून व मोबाईलमध्ये काढलेले अर्धनग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी पैसे घेऊन भाचीला ब्लॅकमेल करून शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. 2008 पासून सुरू असलेला हा प्रकार शुक्रवारी (ता.29) रोजी उघडकीस आला.


याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडिता बजाजनगर येथे रहाते. 6 महिन्यापुर्वी ती एका कॉलेजमध्ये नोकरी करत होती. तिच्या घराच्या जवळच तिचे आई, वडील, बहिण, भाऊ, काकू, काका तसेच आत्या, मामा हे कुटुंबासह राहतात. पीडिता आणि तिच्या आत्याची मुले एकाच शाळेत शिकत असल्याने तिच्या आत्याचे पती (मामा) त्यांना रोज शाळेत सोडायला व घ्यायला यायचा. तो काहीना काही कारणावरून तिच्याशी अश्लील बोलायचा, जाणीवपुर्वक गाडीवर त्याच्या मागे बसवायचे, तिच्याबरोबर जवळीक साधण्याचा प्रयत्न करायचे. परंतु ती लहान असल्याने व तिला त्यातले काही कळत नसल्याने त्याबद्दल कोणाला काही सांगीतले नाही.
पिडिता 9 वी मध्ये असताना तिचे अर्ध नग्न फोटो मोबाईलमध्ये काढले. ही गोष्ट तिने घरी सांगितली. मात्र हा प्रकार घरातला असल्यामुळे व बदनामी होऊ नये म्हणून वाच्चता न करता त्याला समजावून सांगितले होते. त्यानंतर पीडितेची 10 वी झाल्यानंतर एके दिवशी मामाने तीला फोन करून घडलेला प्रकार तुझ्या आई वडीलांना, नातेवाईकांना व बाहेरील लोकांना माहीत झाल्यास ते अंगावर पेट्रोल टाकून तुला जाळून मारून टाकतील अशी धमकी दिली. म्हणून ती गप्प होती. 12 वी झाल्यानंतर पिडीतेचे लग्न झाले. त्यानंतर सुमारे 6 महिन्यानंतर मामाने तिच्या व्हॉटसअपवर आय लव यू , आय मिस यु व प्रेमासंबंधीचे मेसेज पाठवले. ते मेसेज तिच्या पतीने पाहील्यानंतर त्याला जॉब विचारला असता तो म्हणाला की, ते मेसेज चुकून गेले.


सन-2019 मध्ये तिला रस्त्यात अडवून त्याने मला माझ्याकडे तुझे सर्व प्रुफ आहे, तु एकतर माझेशी संबंध ठेव, नाहीतर तुझे सर्व फोटो व्हायरल करील. अशी धमकी दिली. त्यानंतर लगेच 15 दिवसांनी त्याने तिचा पाठलाग करत तु काय ठरवलेस, असे विचारत एकतर माझेशी संबंध ठेव, नाहीतर मला पैसे दे. असे म्हणाला. त्यानंतर घाबरून व संसार मोडेल या भितीने तिने स्वतः चे सोने, नोकरीचे पैसे त्याने मागणी केल्याप्रमाणे देत गेली. आजपर्यंत मामाने सुमारे 1 लाख रुपये रोख घेतले असून तो आणखी पैशाची मागणी करतो.


26 मार्च 2024 रोजी, दुपारी 5 वाजेच्या सुमारास त्याचा कॉल आला व 10 मिनीटात कॉल करायला सांगीतले. कॉल केल्यावर त्याने पुन्हा पैशांची मागणी केली. या सर्व प्रकारामुळे पिडीतेवर आत्महत्येची वेळ आली असून तिने सर्व प्रकार पती व आईवडीलांना सांगीतला. यावेळी देखील तिच्या घरच्यांनी घरातील प्रकरण असल्यामुळे ते घरातच मिटवण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी (ता.29) रोजी आरोपीने पुन्हा एका मुलीची छेड काढली. ही गोष्ट तिने वडीलांना सांगीतली व त्याचा जाब विचारण्यासाठी पिडीतेचा पती व वडील मामाच्या घरी गेले. तेथे वाद होऊन मारामारी झाली. त्यात वडीलांना व पतीला मारहाण झाली. यावेळी आत्यामध्ये आली असता तिला देखील मार लागला. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी प्रभाकर काकडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *